पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरात घेतले दर्शन, मंदिर परिसरातील पुनर्बांधणी प्रकल्पांचा पंतप्रधानांकडून आढावा
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केदारनाथ मंदिरात जाऊन भगवान केदारनाथाचे दर्शन घेतले. पंतप्रधानांनी ऐतिहासिक केदारनाथ मंदिरात प्रार्थनाही केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिर परिसरात सुरु असलेल्या पुनर्बांधणी कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामाच्या प्रगतीची माहिती दिली. त्याशिवाय मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या अनेक लोकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. उत्तराखंड येथे 2013 साली झालेल्या भीषण भूस्खलनानंतर आणि पुरामुळे झालेल्या पडझडीनंतर या मंदिर परिसरात पुनर्बांधणीचे काम जोमाने सुरु आहे.
Please follow and like us: