पंतनगर पोलीस यांच्या तात्काळ मदती मुळे बाळ व बाळंतीण सुखरूप

मुंबई – दिनांक 7 एप्रिल रोजी रात्री १२ वाजून ४७ मिनिटे झाली असताना  नियंत्रण कक्ष येथून मिळालेल्या संदेशा प्रमाणे देरासार लेन येथे आजारी महिलेस मदत देण्यासाठी पंतनगर 5 नं, मोबाईल, 1नं मोबाईल व पोलीस नि. रेणुका बुवा यांची मोबाईल तात्काळ पोहचली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजावाडी रुग्णालयात आंबा नामक या निराधार महिलेस नेले, उपचारा दरम्या 01.17 वा सदर महिला प्रसूत होऊन मुलगा झाला. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत. मदत करणा-यात पो नि. रेणुका बुवा, ASI पवार, पो ह 9916 मोकळ,पो ह 28035 यादव, पो ना 961749 रोकडे, पो शी 070352 स्वामी, पो शी 092249 लालगे, म पो शी 081285 भोईर, म पो शी 091420 पानसरे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.