पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वे 24 विशेष गाड्या सोडणार

मुंबई – महाराष्ट्रातील पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेसाठी यात्रेकरुंची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूर-मिरज-कुर्डूवाडी आणि लातूर दरम्यान विशेष शुल्कासह 24 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

१. 01401/01402 मिरज-पंढरपूर-मिरज डेली स्पेशल (6फेऱ्या)

गाडी क्र. 01401 17,18,19 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटे 5.30 वाजता मिरजहून सुटेल (3फेऱ्या) आणि त्याच दिवशी सकाळी 8.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01402 पंढरपूरहून 17,18,19 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9.50 वाजता सुटेल (3 फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता मिरजला पोहोचेल.

थांबा : अरग, सलगरे,कवठे महाकांळ,धालगांव,जठ रोड, म्हसोबा डोंगरगांव आणि सांगोला

रचना: 15 स्लीपर श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी

२ . 01403/01404 मिरज-कुर्डुवाडी-मिरज डेली स्पेशल (6फेऱ्या)

गाडी क्र. 01403 मिरजहून 17,18,19 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनीटांनी सुटेल (3फेऱ्या) आणि त्याच दिवशी रात्री 8 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल.

गाडी क्र. 01404 कुर्डूवाडीहून 17,18,19 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री साडेआठ वाजता सुटेल (3 फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पाऊण वाजता मिरजला पोहोचेल.

थांबा- अरग, सलगारे, कवळे महांकाळ, धालगांव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगांव, सांगोला, पंढरपूर आणि मोदलिंब

रचना: 15 स्लीपर श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी

३ . 01427/01426 लातूर-पंढरपूर-लातूर डेली स्पेशल (8फेऱ्या)

गाडी क्र. 01427 लातूरहून 19,20,21,23 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 7.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01426 पंढरपूरहून 19,20,21,23 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 2 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी सवा सहा वाजता लातूरला पोहोचेल.

थांबा: हरंगुल, औसा रोड, ढोकी, येडसी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी शहर, शेंदरी, कुर्डूवाडी आणि मोडलिंब

रचना : 8 स्लीपर श्रेणी आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणी

४ . 01405/01406 पंढरपूर-मिरज-पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)

गाडी क्र. 01405 पंढरपूरहून 17,18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता सुटेल (2 फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता मिरजला पोहोचेल.

गाडी क्र. 01406 मिरजहून 17,18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.50 वाजता सुटेल (2 फेऱ्या) आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजून 10 मिनीटांनी पंढरपूरला पोहोचेल.

थांबा : सांगोला, म्हसोबा, डोंगरगांव, जठ रोड, धालगांव, कवठे महांकाळ, सालगरे आणि अरग

रचना : 2 स्लीपर श्रेणी आणि 9 सामान्य द्वितीय श्रेणी

आरक्षण: 01401,01402,01403,01404,01405 आणि 01406 या विशेष गाड्यांचे आरक्षण याआधीच सुरु झाले असून 01427 आणि 01426 या विशेष शुल्काच्या गाड्यांचे आरक्षण सर्व पीआरएस स्थानकांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन 17 नोव्हेंबर 2018 रोजी सुरु होईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email