न्यायालयीन निर्णयानंतर अनधिकृत बांधकामांवर सरसकट कारवाई – महापौर डिंम्पल मेहता

( तेजस राजे )

मिरा भाइंर्दर महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाविरुध्द नियमित कारवाई करण्यात येत असून मोठया प्रमाणात लॉजिंग-बोर्डिंगच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांची सुनावणी १८ व २४ नोव्हेंबर रोजी असल्याने त्यांच्यावरील निर्णयानंतर निष्कासन कारवाई केली जाईल. तसेच आणखी जी अनधिकृत बांधकामे आहेत त्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार सरसकट कारवाई करण्यात येईल असे महापौर डिंम्पल मेहता यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. नरेेश गिते यांनी सांगितले की, मी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून पर्याप्त कारणाशिवाय महासभेत अनुपस्थित राहीलो नाही. तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासकीय कामे सुरळीतपणे सुरु असून त्या संदर्भात महापौरांच्यासोबत समन्वय ठेवण्यात येत आहे.

आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना कायद्यातील तरतूदीनुसार बैठकीस उपस्थित राहण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
काशिमिरा येथील बी.एस.यु.पी. योजनेतील लाभार्थ्यांना भाडे अदा करणेबाबत ठेकेदारासोबत करारनामा करण्यात आला असून सदर लाभार्थ्यांना भाडे देण्याचे काम हे संबंधित ठेकेदाराचे आहे. त्या संदर्भात करारनाम्यातील अटीप्रमाणे संबंधितांना बांधकाम विभागाकडून सूचना दिल्या आहेत.

महापालिकेतील अधिकाऱ्यांविरुध्द कार्यवाहीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर चौकशी करणे, दोषी आढळून आल्यास कार्यवाही करण्यात येते. मागील एका वर्षात ७ अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यात आलेली आहे. नियमानुसार इतरांवर देखील कार्यवाही करण्यात येईल.

तसेच अविनाश जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यास केलेल्या शिवीगाळी बाबत चौकशी करण्यात आली असून चौकशी अंतिम टप्यात आलेली आहे. त्यामध्ये दोषी आढळून आल्यास त्यांचेविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email