नौदल कमांडर परिषदेची (2018) सांगता
या वर्षातल्या द्वैवार्षिक कमांडर परिषदेची सांगता झाली. देशाच्या सागरी सुरक्षा कायम राखण्यात केलेल्या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांनी भारतीय नौदलातल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
सररकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला स्वदेशीकरण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या देत असलेल्या पाठिंब्याचेही त्यांनी कौतुक केले. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात ‘डिजिटल नेव्ही’ सत्यात उतरवण्यासाठी भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत सितारामण यांनी समाधान व्यक्त केले. या विभागातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात एसएजीएआर या पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून या भागातल्या इतर देशांच्या नौदलांना सहाय्य करण्यासाठी नौदल करत असलेल्या राजनैतिक प्रयत्नांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
केरळमधल्या महापुरात 17 हजार जणांची सुटका करण्यात नौदलाने बजावलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. देशवासियांसाठी सरकारच्या काळात तारणहार ठरणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळे भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याचे त्या म्हणाल्या.
नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनीही विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.