* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> नो एन्ट्री मधून जाण्यास रोखल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगवार बाईक घातली – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

नो एन्ट्री मधून जाण्यास रोखल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगवार बाईक घातली

कल्याण- नो एन्ट्री मधून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर दुचाकीस्वाराने बाईक घातल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात शफक नियाज अहमद शेख २३ ,दाऊद शोएल अन्सारी या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
 कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौकात गत शुक्रवारी सवा सात वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी  परळीकर वाहतूक नियोजनाचे काम करत होते .यावेळी रामबाग सुभाष चौकात नो एन्ट्री मधून एक दुचाकी भरधाव वेगाने जात होती यावेळी परळीकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी दुचाकी परळीकर यांच्या अंगावर घातली त्यामुळे परळीकर यांच्या पायाला दुखापत झाली  त्यानंतर त्या ठिकाणी असणार्या ट्राफिक वार्डन तुषार शिरसाथ याने त्यांना पाठलाग करत थांबवले यावेळी बाईक वर बसलेल्या शफक नियाज अहमद शेख २३ ,दाऊद शोएल अन्सारी या दोघानि शिवीगाळ करत धक्काबुक्की केली .या अपघातात परळीकर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी काल महत्मा फुले पोलीस स्थानकात शफक नियाज अहमद शेख २३ ,दाऊद शोएल अन्सारी या दोघा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *