नोटबंदीचा एक वर्ष पूर्ण,आम आदमी पक्षानी धोका दिवस म्हणून साजरा केला
( पूजा उगले )
मागील वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक निर्णय घेतला की ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा चलनातून रद्द करण्यात येतील ज्याअचू एकूण किंमत ₹१५४४००० कोटी इतकी होती. पंतप्रधान मोदजींनी सांगितले होते की या निर्णयामुळे काळा पैसा, नकली नोटा आणि दहशतवाद यासाठी नोटबंदी हा एक रामबाण उपाय आहे.
रिसर्व बँकेच्या अहवालानुसार जवळपास ९९% रक्कम(₹१५२८०००कोटी) बँकेत परत जमा झाली आहे. मग काळा पैसा कुठे गेला?? काळा पैसा असणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आपला पैसा पांढरा करून घेतला.
दुसरा महत्वाचा मुद्दा जो सांगितला होता तो म्हणजे दहशतवाद. काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांकडे ₹२००० च्या नोटांची बंडले सर्वसामान्य लोकांच्या आधी पोहोचलेली आढळून आली.
नकली नोटांच्या बाबतीतही हेच आढळून आले. रिसर्व बँकेने कुठलीही नोटबंदी न करता २०१६-१७ आर्थिक वर्षात ₹५०० आणि ₹१००० च्या ५,७३,८९१ हस्तगत केल्या तसेच त्याअगोदरच्या आर्थिक वर्षात ४,०४,७९४ नोटा ओळखल्या होत्या.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही बहुतांशपणे रोखीच्या व्यवहारांवर चालते. जवळपास ९४% रोजगार हा असंघटित क्षेत्रात आहे. नोटबंदीच्या आततायी निर्णयामुळे लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. कृषी क्षेत्रावर भीषण मंदीची गडद छाया आली आहे.
नोटबंदी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. सरकारच्या जनविरोधी निर्णयाचा कल्याण डोम्बिवली सह मुम्बईच्या १० ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने धोका दिवस म्हणून निषेध व्यक्त करण्यात आल. ह्या निषेध कार्यक्रमात आप कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.