नोकराने दिड लाखांचा मुद्देमाल लांबवला

डोंबिवली  – पुणे येथे राहणारे साजन जोसेफ यांचे डोंबिवली नजीक खोणी फाटा तळोजा रोड येथे भूमी इंफा नावाने गोडावून आहे .गेल्या आठवड्यात १७ तारखेला रात्रीच्या सुमारास या गोडावून मध्ये काम करणाऱ्या रोहित बनू या कर्मचार्याने त्याच्या गोडावून मधून तब्बल १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .सदर बाब निदर्शनास आल्याने जोसेफ यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रोहित बनू विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तर दुसरी घटना कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात उघडकीस अली आहे .ठाणे येथे राहणारे वीरेंद्र शुक्ला यांचे कोल्शेवादी शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये कृष्णा इंटरप्रायजेस नावाने दुकान आहे .१४ मार्च रोजी सायंकाळी उशीर झाल्याने ते कार्यलयात झोपले यावेळी त्यांच्याकड काम करणारा हनुमंत लोकरे हा त्यांच्या सोबत झोपला होता मालक झोपल्याची संधी साधत लोकरे याने कमेरा ,घड्याळ व लामिनेशन मशीन असे मिळून एकूण १९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला वीरेंद्र शुक्ला याने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email