नीती आयोग समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक जारी करणार
नवी दिल्ली, 13 – जल संसाधनाच्या प्रभावी व्यवस्थापन क्षेत्रातली कामगिरी सुधारण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून नीती आयोग समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक जारी करणार आहे. पाण्याचा सुयोग्य वापर आणि त्याचा पुनर्वापर याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
जल संसाधनांची मर्यादित उपलब्धता आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता जल संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग करता येणार आहे. राज्यांकडून प्रतिसाद मागविल्यानंतर आणि तज्ञांशी सल्लामसलत करुन विस्तृत अभ्यासाअंती याला अंतिम रुप देण्यात आले आहे.
जल संसाधनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सुयोग्य उपाय आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्देशांक, राज्यांना आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि खात्यांना उपयुक्त माहिती पुरवेल.