केंद्रीय मंत्री नि‍तीन गडकरी, यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

(कर्ण हिंदुस्तानी )

श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळा यशस्‍वी करण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासन योग्‍य ते सहकार्य करुन केंद्र शासनाच्या माध्यमातून सुसज्ज रस्‍त्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीकेंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उपलब्‍ध करुन देणार असल्याची ग्‍वाही  दिली.

केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्गनौकानयन व जलसंपदा मंत्री श्री.नितिन गडकरी यांनी आज श्रीसाईबाबांची माध्यान्ह आरती करून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी भाजपाचे राष्‍ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, पालकमंत्री राम शिंदे, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, आमदार सौ.स्‍नेहलता कोल्‍हे आदी उपस्थित होते. संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त बिपीन कोल्हे व उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदिप आहेर यांनी मान्‍यवरांचा सत्‍कार केला. श्री हावरे यांनी संस्‍थानव्‍दारे साईभक्‍तांकरीता राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. दर्शनानंतर श्री.गडकरी यांनी संस्‍थानच्‍या रक्‍तदान संकलन केंद्रास भेट दिली.

याप्रसंगी श्री.गडकरी म्हणाले, शिर्डी शहराशी तसेच राज्यातील जोडले जाणारे रस्ते भाविकांना सुखदायक व्हावेत यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देणार आहे. शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. श्री साई बाबा समाधी शताब्दी महोत्सव यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल. संस्‍थानच्‍या रक्‍त संकलन केंद्रास भेट देवून त्‍यांनी रक्‍त दात्‍यांची विचार पुस केली. तसेच रक्‍तदानाचा संस्‍थानचा हा उपक्रम राज्‍याला आदर्शवत असल्‍याचे सांगून साईबाबा संस्‍थान साईभक्‍तांकरीता राबवत असलेल्‍या विविध सोयी-सुविधांबाबत समाधान व्‍यक्‍त केले. देशातील सर्व सामान्‍य नागरिक, कामगार, शेतकरी यांना चांगले दिवस यावेत, यासाठी आपण साई चरणी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email