निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृतीवेतन धारकांनी कागदपत्रे जमा करावीत
निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृतीवेतन धारकांनी कागदपत्रे जमा करावीत.
ठाणे.दि २० : निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृतीवेतन धारकांनी कागदपत्रे जमा करावीतअसे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे आणि त्यांनी वार्षिक निवृतीवेतन ३ लाख किंवा अधिक आहे आणि ज्या निवृतीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे वय ८० वर्षावरील आहे त्यांचे ५ लाख किंवा त्याहून जास्त निवृत्तीवेतन असलेल्यांनी आयकर पात्र गुंतवणुकीची किंवा बचतीची माहिती व पॅनकार्ड झेरॉक्स जिल्हा कोषागार कार्यालयात तात्काळ सादर करावी .
२७ डिसेंबर पर्यंत निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारक सादर करणार नाहीत त्यांच्या निवृत्ती वेतनातून माहे डिसेंबर १७,जानेवारी १८,फेब्रुवारी १८ मधून आयकराची संपूर्ण रक्कम वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.