निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी निवडणूक दूत बनावे

 

( श्रीराम कंदु )

निवडणूक व निवडणूक प्रक्रिया या विषयाबाबत काल २५ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. सदर ज्ञान स्पर्धेच्या 5 फे-या होणार असून हे विद्यार्थी शालेय स्तरावर व तालुका स्तरावरून पात्र झाले होते. या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हयाकरिता निवडणूक दूत (Election Ambassadors) म्हणून काम करावे असे आवाहन करण्यात आले.

शालेय स्तरावरील स्पर्धेमध्ये पात्र ठरलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 14 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर (पहिली फेरी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती. यात 640विद्यार्थी पात्र ठरले होते. सदर तालुका स्तरावरील स्पर्धेतून पात्र ठरलेल्या 640 विद्यार्थ्यांमधून प्रथम व व्दितीय आलेल्या 25 विद्यार्थ्यांची  काल  स्पर्धा घेण्यात आली.

मतदारात जागृती निर्माण करावी

या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना पालकांना तसेच शिक्षकांना निवडणुकीचे महत्त्व पटवून सांगितले. गेल्या दीड वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये  विद्यार्थी तसेच शिक्षकांचा मोठा सहभाग होता. यापुढे देखील शिक्षकांनी आणि पालकांनी मतदारात जागृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हयातील सर्व शाळांमधील 14-17 वर्षे या वयोगटातील 9 ते 12 वी मधील व भविष्यात नवमतदार म्हणून नोंदणी होणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी निवडणूक व निवडणूक प्रक्रिया हया विषयाबाबत विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावरील पात्र ठरलेले शाळेमधील विद्यार्थ्यांची  आज  जिल्हास्तरावर (दुसरी फेरी) स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम ,जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव, तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील ,विद्यार्थी,पालक, शिक्षक उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email