निळजे पोस्ट ऑफिसच्या स्थलांतराला विरोध करत गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन ….

डोंबिवली – डोंबिवलीजवळील निळजे गावातील पोस्ट ऑफिस स्थलांतर करून लोढा पलावा येथे केले जाणार असून या पोस्ट ऑफिसचे नामकरण पलावा पोस्ट ऑफिस करण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांच्या या मागणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत भेट घेऊन केंद्रींय मंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेतली. निळजे येथील पोस्ट ऑफिसचे स्थलांतर होणार नाही असे आश्वासन खासदार शिंदे यांना दिले.  
   
शुक्रवारी  डाक विभागाचे अधिकारी या पोस्ट ऑफिस मधील दफ्तर घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच  सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी आणि गावकरी पोस्ट ऑफिससमोर जमा झाले. पोस्ट ऑफिसचे स्थलांतराला विरोध करत गावकऱ्यांनी  पोस्ट ऑफिस समोर ठिय्या आंदोलन केले.निळजे, निळजेपाडा, घेसर, संदप, उसरघर, भोपर, कॅसा बेला, कॅसा रिओ गोल्ड, लोढा हेरीटेज, नवनीतनगर, पालवा  या वसाहतींना निळजे येथील पोस्टाची सेवा पुरविण्यात येत असते. मात्र डाक विभागाकडून अचानक निळजे येथील पोस्ट ऑफिसचे स्थलांतर होणार असल्याची समजताच सर्व पक्षिय युवा मोर्च्याचे पदाधिकारी गजाजन पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शविला आहे. याबाबत गजाजन पाटील म्हणाले, गावकऱ्यांना विश्वासात न घेता येथील पोस्ट ऑफीसचे स्थलांतर करणे चुकीचे आहे. यामुळे गावकऱ्यांना त्रास होणार असून या पोस्ट ऑफिसचे नाव `पलावा पोस्ट ऑफिस` करू नये. या आदोल्नात सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी गजानन पाटील, गिरीधर पाटील, महेंद्र पाटील, प्रेमनाथ पाटील,सतीश पाटील यासंह अनेक गावकरी सहभागी झाले होते.खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी तातडीने केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा याची भेट घेऊन निळजे येथील पोस्ट कार्यालय हलवू नये अशी मागणी करणारे निवेदन दिले सिन्हा यांनी तातडीने ही मागणी मान्य करून निळजे पोस्ट ऑफिस हलवणार नाही व नावही बदलणार नाही अशी ग्वाही देऊन तशा सूचना देण्यात येतील असे सांगितले. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email