नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना  आरटीओकडून समज,वाहतूक पोलिसांचे अभय

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – डोबिवलीतील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या इंदिरा चौकात मुजोर रिक्षाचालकांना  उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी  समज दिली. मात्र  दुसरीकडे या चौकातून जाणाऱ्या मोटरसायकलस्वारांवर वाहतूक पोलीसांकडून कारवाई केली जाते. मात्र वाहतूक कोंडीस जबाबदार असलेल्या रिक्षाचालकांना अभय देत असल्याचे दिसते.   

     या चौकात नेहमी वाहतूक कोंडी होत असून अनधिकृत रिक्षा  थांबे  आणि बेशिस्त रिक्षाचालक जबाबदार असून ससाणे  यांनी पाहाणी केली. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजय ससाणे , अधिकारी  आणि ईगल ब्रिगेड फांउडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी इंदिरा चौकाची पाहणी केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना ससाणे यांनी  समज दिली.  समज देऊनहि बेशिस्तपणामुळे या चौकात वाहतूक कोंडी होण्यास रिक्षाचालक जबाबदार असतील त्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल असे ससाणे यांनी सांगितले. दरम्यान  या चौकातील अनधिकृत रिक्षा थांब्यांबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने भूमिकेबाबत स्पष्ट केले नाही. या चौकात वाहतूक पोलीस मोटरसायकलस्वारांची कागदपत्रे तपासण्याची कामे करत असतात. परंतु बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास कानाडोळा केला जातो अशी ओरड डोंबिवलीकरांकडून सुरु आहे. दरम्यान  रिक्षाचालकांसाठी बनलेल्या युनियनने या चौकातील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे  देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.