नितीन गडकरी यांच्याकडून उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि प. बंगालमधल्या नमामि गंगे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

नवी दिल्ली, दि.२४ – केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी नमामि गंगे प्रकल्पांतर्गत उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि प. बंगालमध्ये सुरू असलेल्या विविध कामांचा काल सखोल आढावा घेतला. या आढावा बैठकीला विविध विभागांचे उच्च अधिकारी आणि राज्य सरकारमधले अधिकारी तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी करणारे कंत्राटदार उपस्थित होते.

या सर्व प्रकल्पांच्या कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश गडकरी यांनी दिले. सर्व प्रकल्पांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नमामि गंगे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अविरल गंगा प्रकल्पासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे, असे सांगत नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी प्रक्रिया केंद्र बांधली जात आहेत, असेही ते म्हणाले. नदी किनारी घाट आणि स्मशान घाट बनवण्याचे काम मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. नमामि गंगे अभियानाचे 70 ते 80 टक्के काम मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले.

नमामि गंगे अभियानांतर्गत सध्या विविध राज्यांमध्ये 288 प्रकल्प सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.