नाशिकमध्ये मनमाड- मुंबई महामार्गावर भीषण अपघातात कल्याणातील १० जणांचा मृत्यू ?

(म.विजय)

कल्याण – मनमाड- मुंबई- आग्रा महामार्गावर सोग्रस गावाजवळ वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात त्यात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर ११ जण जखमी झाले असून हे सर्व जण कल्याणातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहेत. अपघातातील जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याणातील सुमारे २० ते २२ जण अधिक मासानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनाला गेले होते. त्यावरून परतत असताना पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वाळूच्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्यात उभा होता. त्यावेळी भरधाव येणाऱ्या मिनीट्रॅव्हल्सने ट्रकला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले होते. जखमींमधील चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेले सर्वजण कल्याणचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच कल्याणहून त्यांचे नातेवाईक नाशिकला रवाना झाले असून अद्याप मृतांची आणि जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email