* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> नालासोपाऱ्यात ‘सनातन’साधकाच्या घरात सापडला स्फोटकांचा साठा – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

नालासोपाऱ्यात ‘सनातन’साधकाच्या घरात सापडला स्फोटकांचा साठा

नालासोपारा – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने म्हणजे एटीएसने नालासोपारा येथे धाड टाकून वैभव राऊत या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. परंतु सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा सनातनता साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असं स्पष्टीकरण दिल आहे. दरम्यान वैभव राऊत असं काही करेल असं मला वाटत नाहीअशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी सरकारी यंत्रणेवरच संशय व्यक्त करत वैभव राऊतच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही असं म्हटलं आहे. तसेच आम्ही त्याला सर्व मदत करु असं स्पष्ट करताना त्यांनी पोलिस यंत्रणेवर तसेच गृहखात्यावरच अविश्वास दाखवला आहे. राज्याचे गृहमंत्री जाणूनबुजून सर्व घडवत असल्याचा सनसनाटी आरोप सुद्धा संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जातो आणि तेच वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत असंही संजीव पुनाळेकर म्हणाले आहेत. दरम्यान एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊत याच्या घरातून तसेच दुकानातून अनेक संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. राऊतचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *