नालासोपारा रेल्वे स्थानकातवर एका महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

नालासोपारा येथे राहणारी रेश्मा बेगम ही २६ वर्षीय महिला गर्भवती महिला गोरेगावला जात होती. त्यावेळी तिला अचानक कळा येऊ लागल्या आणि रेल्वे स्थानकात असणाऱ्या पादचारी पुलावरच तिने आपल्या बाळाला जन्म दिला. ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. रविवार असल्याने काल रेल्वे स्थानकात नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. नालासोपारा स्थानकाचे अधीक्षक रामकेश मीना यांना ही गोष्ट समजताच त्यांनी तत्काळ 108 या सरकारी रुग्णवाहीकेच्या क्रमांकावर फोन केला. त्यानंतर डॉक्टर आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली.

यानंतर रेश्मा हिला पुढील उपचारासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रेश्मा ही नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडे हनुमान नगर येथे राहते. स्थानकावर उपस्थित असलेल्या महिला नागरिक आणि अधिक्षकांनी दाखवलेले प्रसंगावधान यामुळे ही प्रसुती योग्य पद्धतीने पार पडली. हे नवजात अर्भक आणि त्याची आई दोघांचीही तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधीही रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्थानकात गर्भवती महिलांची प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email