नारी शक्ती पुरस्कार 2018 साठी नामांकनाची मुदत 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत वाढवली
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नारी शक्ती पुरस्कार 2018 साठी नामांकन प्राप्त करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत वाढवली आहे. महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या असामान्य कार्य करणाऱ्या महिला तसेच संस्थांना प्रदान करण्यात येणारा हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्कारांचे हे 19 वे वर्ष असून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याला या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
महिला सबलीकरण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांनी या पुरस्कारासाठी अर्ज दाखल करावे असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केले आहे.उपसचिव (महिला आणि बालविकास) महिला आणि बालविकास मंत्रालय, खोली क्र. 632, 6 वा मजला, शास्त्री भवन, नवी दिल्ली 110001 येथे नामांकनासाठी आवश्यक ती कागदपत्र सादर करायची आहेत.