नायब तहसिलदाराला लाच घेताना रंगेहात अटक

चंद्रपूर – महिनाभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १५ हजारची लाच मागणा-या नायब तहसिलदाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे.गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदर करवाई केली असुन या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय भगवान राठोड (वय ३३), असे या अटक करण्यात आलेल्या नायब तहसिलदाराचे नाव असून तो ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार आहे. नायब तहसिलदार राठोड याने ट्रॅक्टरने घाटावरून रेतीची वाहतूक करणा-या तक्रारदार यांचा ट्रॅक्टर अडवून रेतीची वाहतूक करताना महिनाभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १७ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपयांची लाच ठरली. लाच घेताना राठोड याला गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. राठोडविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.