नाना पटोलेंकडे किसान, खेत, मजदूर काँग्रेसची जबाबदारी

नागपूर – भाजपला राम राम ठोकून कॉग्रेस मध्ये आलेले भंडारा चे माजी खासदार काँग्रेसचे नाना पटोले यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान, खेत, मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने विदर्भातील राजकारणात बदल होण्याची आता शक्‍यता वाढली आहे. ओबीसी चेहरा काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे आणला आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांना काँग्रेसने अखिल भारतीय स्तरावरील पद दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून भाजपला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांची काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात पटोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे फळ म्हणून पटोले यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे.

नाना पटोले यांच्या नियुक्तीने मात्र विदर्भातील राजकारणात आता बदल होण्याची शक्‍यता आहे. नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असून विदर्भातील नेत्यांना वरिष्ठ पद दिल्याने विदर्भातील काँग्रेस संघटना बळकट होण्यास मदत होणार आहे. या नियुक्ती विदर्भातील प्रस्थापितांनाही जोरदार धक्के बसले आहेत. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना अ. भा. काँग्रेस समितीमध्ये कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email