नागरिकांच्या सतर्कतेमुळे सहा अल्पवयीन सायकल चोरटे पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : नागरिकांच्या सतर्कतेमुळे सहा अल्पवयीन सायकल चोरटे मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले .या सहा मुलानी लोढा हेवन परिसरातील आजमितीला चार सायकल चोरल्याची कबुली दिली असुन या सायकली परत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
डोंबिवली पुर्वेकडील लोढा पलावा सिटी येथे डोंबिवली कोळे गाव परिसरात राहनरे सहा अल्पवयीन मुलं संशयित रित्या फिरताना आढळून आले नागरिकांना संशय आल्याने त्यांनी या मुलांना हटकले असता या मुलानी पळून जाण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी पाठलाग करत मुलांना पकडले नागरिकांचा रुद्रावतार पाहून मुलांनी आपण सायकल चोरी करत असल्याची कबुली दिली. या नंतर नागरिकांनि या मुलांना मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले .पोलिसांना या मुलांनी चार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्या चोरी केलेल्या सायकली पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Hits: 38