नागपूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत ठाणे शहराला जनरल चॅपियनशिप
ठाणे: भारताचा पारंपारींक कुस्ती खेळाला येणाऱ्या काळात महत्व येणार असून पुर्वी प्रमाणे या खेळाला वैभव प्राप्त करुन देण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व नागपूर महानगर पालीका च्या संयुक्त विद्यमाने २० वी वरिष्ट व २ री सब ज्युनिअर महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०१८ ला दि १९ ते २९ जानेवारी २०१८ ला नागपूर येथील चिटणीस पार्क मध्ये संपन्न झाली या स्पर्धेत ठाणे शहर तालीम संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे शहराचे महिला कुस्तीगीर संघाला सांघिक गुणांच्या आधारे जनरल चॅपियनशिप क्र. २ जाहीर करण्यात आले याबरोबर १ सुवर्णपदक व ४ कास्यपदके मिळवले या ठाणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला संघातील कु देवकी राजपूत हिने सतत ३ ऱ्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेले आहे. शहराचे अन्य कुस्तीगीर अनुक्रमे कु प्राजक्ता पानसरे ( ५५ किलो ) , कु.सरोज पवार (५७ किलो ), मोनिका कदम (६२ किलो ) आणि अनुराधा आकाट (७२ किलो) यांनी या स्पर्धेत कास्यपदक मिळविलेली आहेत. ठाणे शहर खेरीज ठाणे जिल्हा ग्रामीण संघातील कु. मनाली चंद्रकांत जाधव हिने देखील २५ किलो वजनी गटांत सुवर्णपदक मिळविलेले असून कु. कोमल देसाई ( ५३ किलो ) आणि पूजा शिर्के (७२ किलो सब जुनियर ) यांनी कास्यपदके मिळविलेली आहेत.
ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीगीर भवन गावदेवी ठाणे येथे विनाशुल्क कुस्ती प्रशिक्षण व सराव केंद्रात वस्ताद विलास बबले यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला कुस्तीगीर प्रशिक्षण घेत असून या सांघिक कामगिरीमुळे ठाणे शहराला हा बहुमान मिळालेला आहे. ठाण्यात या कामगिरीमुळे महिला कुस्ती खेळात इतिहास घडलेला आहे.
ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठाणेकर आणि पदाधिकारी सर्वश्री सर्जेराव शिंदे , रमाकांत पाटील, तुकाराम खुटवड, विकास निकम प्रभूतीनी सदर प्रशिक्षण केंद्र चालविण्यास मोठे योगदान दिलेले असून त्यांनी सर्व महिला कुस्तीगीरींचे अभिनंदन केले आहे. या विजयामुळे संस्थेचे संपादकीय अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव ठाणेकर यांनी पाहिलेले स्वप्न साकार झालेले