नांदिवलीची पैलवान माधवी कुरळेचा राष्ट्रीय स्तरीय निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक..
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.२२ – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने आणि राजस्थान कुस्ती संघाच्या वतीने राजस्थान मधील चित्तोडगढ तालुक्यात २७ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी यशश्वीरित्या पार करत जय बजरंग क्रीडा मंडळ व्यायाम शाळा नांदिवली च्या पैलवान माधवी नकुल कुरळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकणठाण शहरातील जंगली महारात मठ व्यायाम शाळेत पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरीय निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले.
माधवीच्या या यशाबद्दल तिचा प्रत्येक क्षेत्रातून शुभेश्च्याचा वर्षाव होत असून कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था संलग्न जय बजरंग क्रीडा मंडळ व्यायाम शाळा नांदिवली चे प्रशिक्षकांकडूनही माधवीचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते .यावेळी जिद्द, चिकाटी आणि सरावातील सातत्यता यामुळेच माधवी हिने हे यश संपादन केले असल्याचे राष्टीय पंच रामदास ढोणे यांची माधवीचा जाहीर सत्कार सोहळ्या प्रसंगी सांगितले. पैलवान माधवी नकुल कुरळे ही गेल्या वर्ष भरा पासून कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था संलग्न जय बजरंग क्रीडा मंडळ व्यायाम शाळा नांदिवली येथे तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.
राजस्थान मधील चित्तोडगढ तालुक्यात सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा कोपरगाव तालुक्यातील कोकणठाण शहरातील जंगली महाराज मठ व्यायाम शाळेत पार पडली. राष्टीय स्तरीय चाचणी निवड स्पर्धेत पाच वर्षे वयोगटा पासून ते तेवीस वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग असून फ्री स्टाईल आणि गृकोरोमं कुस्ती प्रकारचा सहभाग स्पर्धेत दिसून आला. या निवड चाचणी स्पर्धेत पाचशेहून अधिक पैलवान मुला मुलीं सहभागी झाले असून या स्पर्धेतील वजनी गटातील प्रथम, द्रुतीय आणि तृतीय विजयी स्पर्धकांना राजस्थान मधील चित्तोडगढ तालुक्यात २७ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याने राष्ट्रीय स्तरीय निवड चाचणी स्पर्धेतील सामने अतिशय अटीतटीचे खेळवण्यात आले. या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत कुमारी माधवी नकुल कुरळे हिने प्रतिस्पर्धीला धूळ चारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.