नव्या वर्षाच्या प्रारंभीच पाणी कपातीचे संकट
(श्रीराम कांदु )
डोंबिवली : उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात आलेल्या अपयशने ही उणीव भरून काढण्यासाठी पाणी कपातीचा मार्ग काढला आहे. तसेच पाण्याच्या नियोजनातील नाकर्तेपण झाकण्यासाठी ही कपात लागू करूनआम्ही पाण्याची बचत करतो अशी सावरा-सावर करीत असल्याची टीका शहरात सुरू झाली आहे. ही कपात १५ जुलैपर्यंत म्हणजे येणाऱ्या साडेसहा महिन्या