नवी दिल्लीत 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2018 दरम्यान वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल
नवी दिल्ली, दि.२२ – नवी दिल्लीतल्या जनपथ मार्गावरील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2018 दरम्यान “वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. सेंद्रीय शेती आणि ती करणाऱ्या महिला शेतकरी व उद्योजकांना प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांच्या सबलीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून एक मंच उपलब्ध झाला असल्याचे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे. देशभरातल्या 500 महिला उद्योजक या प्रदर्शनात भाग घेणार आहेत.
Please follow and like us: