नवीन विहीर व दुरुस्तीसाठी अनुदानाकरीता अनुसूचित जाती, जमाती,नवबौद्ध शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

(श्रीराम कांदु )

ठाणे: नवीन आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे अनुसूचित जाती, जमाती  व नवबौद्ध शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) हि योजना चालू वर्षी  राज्य शासनाने जाहीर केली आहे.

भरघोस अनुदान

यासाठी नवीन विहीर अनुदान २लाख ५०हजार रुपये,जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये,शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण १लाख रुपये,वीज जोडणी आकार १० हजार , पंपसंच २५ हजार(फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लागू), इनवेल बोअरिंगसाठी २० हजार रुपये, सूक्ष्म सिंचन अंतर्गत अ)तुषार सिंचन २५ हजार रुपये ब)ठिबक संच ५० हजार रुपये, परसबाग साठी २०० रुपये(फक्त आदिवासी उपयोजना(क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अनुदान देण्यात येईल.

अटी आणि शर्थी

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा,शेतकऱ्यांकडे जात प्रमाणपत्रसोबत जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,शेतकऱ्याकडे त्याचे स्वतःचे नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर शेतजमीन असावी,शेतकऱ्याच्या नावचा जमीनधारक असल्याचा सात बारा  व ८अ उतारा असणे आवश्यक आहे,लाभार्थीचे आधारकार्ड व बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे,दारिद्र्यरेषेखालील(बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांना वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही परंतु ज्यांचे सर्व मार्गाने वार्षिक उत्पन्न१ लाख५० हजारचे मर्यादेत आहे अशांनी संबधीत तहसीलदाराकडून २०१६-१७ चे उत्पन्नाचा दाखला घेवून तो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तलाठी विहीर नोंद नसल्याचा दाखला आवश्यक असून  प्रस्तावित विहीर पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फुटापेक्षा लांब अंतरावर असावी, तसेच ग्रामसभा ठराव आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने ३०नोव्हेंबर पर्यंत सादर करून या अर्जाची प्रत सर्व आवश्यक कागदपत्रांसह कृषी अधिकारी(विघयो) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाची आहेत.अधिक माहितीसाठी कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आव्हान कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email