नवा हंगाम, नवी आव्हानं.पुन्हा ‘लगोरी लगोरी लगोरी’चा नारा,लगोरी इंडियन प्रीमियर लीग

आज पासून रंगणार लगोरी इंडियन प्रीमियर लीग

लगोरी सारख्या देशी खेळाची आयपीएलच्या पद्धतीने स्पर्धा घेण्याच्या ईष्रेने प्रेरित होऊन महाराष्ट्र लगोरी संघटनेने लगोरी प्रीमियर लीगची घोषणा केलीये. लगोरी विश्वाला नवा आयाम देणाऱ्या ‘लगोरी इंडियन प्रिमीयर लीग’च्या दुसऱ्या मोसमाचा दम सध्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये घुमतोय. यंदाच्या नव्या मोसमाची सुरवात 21 मे पासून सुरू होतेय. पनवेलमधले कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचे पटांगण यंदाच्या लगोरी प्रिमीयर लीगचे साक्षीदार होणार आहे

खेळ आणि मनोरंजन यांची सांगड घालून तयार करण्यात आलेला हा फॉर्म्युला लोकप्रिय करण्यासाठी महाराष्ट्र लगोरी संघटना  सज्ज झाली आहे. पहिल्या लगोरी प्रीमियर लीगच्या  प्रचंड यशानंतर महाराष्ट्र लगोरी संघटना लगोरी चाहत्यांसाठी 10 संघाची मेजवानी घेऊन येत आहे. यात मुंबई लायन्स, महाराष्ट्र फायटर, कर्नाटक शोकेर्स, दिल्ली किग्स, ग्वालियार रॉयल्स, ईस्टर्न पँथर, कोलकाता टायगर्स, पंजाब स्ट्रायकर्स, चेन्नई कॅकर्स, आणि डेक्कन शार्क या 10 संघाची चुरस यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये दिसणारय. लागोरीचे जनक स्व. संतोष गुरव यांच्या प्रयत्नाने लगोरी हा आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय असा खेळ बनला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या 21 मे व 22 मे रोजी लगोरी प्रीमियर लीग रंगणार आहे. लागोरीला आलेली मरगळ लगोरी प्रीमियर लिगमुळे दूर झालीये. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक, नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार, पनवेल महापालिकेच्या शिक्षण व क्रिडा सभापती विद्या गायकवाड, एक.के.ग्रूपचे उद्योजक संजीव कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

सगळीकडे पुन्हा ‘लगोरी लगोरी लगोरी’चा नारा सुरू झालाय, त्यामुळे लगोरी प्रीमियर लीगचे विस्तारलेले रूप चाहत्यांना भावेल का, याची उत्सुकता आता सर्वाना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.