नवयुग मित्र मंडळाची आदिवासी बांधवाना मदत ..

महिनाभर डोंबिवलीतील नागरिकांकडून मदत जमा करून आदिवासी बांधवाना वाटप

 डोंबिवली- सालाबादप्रमाणे यंदाही डोंबिवलीतील नवयुग मित्र मंडळाने जव्हार तालुक्यातील खडखड या अदिवशी पाड्यात कपडे वाटप केले. तांदूळ, गहू, साखर,गोडतेल, साबण, चहापती इत्यादी वस्तूहि आदिवासी बांधवाना दिल्या. मंडळाचे सदस्य यासाठी महिनाभर डोंबिवलीतील नागरिकांकडून मदत जमा करत होते.

हे मंडळ गेली तीन वर्ष हा उपक्रम करत आहे.अध्यक्ष डॉ. सुभाष जावडेकर यासह उपाध्यक्ष योगेश वागळे, सचिव चिराग ठक्कर, खजिनदार स्वप्नील कुलकर्णी, सल्लागार रविंद्र शिंदे, यांसह महिला सभासद अपूर्वा शिंदे, अनुजा जावडेकर, ज्योती शिंदे यांनी मेहनत घेतली. हे मंडळ गुडीपाडवा आणि दिवाळी या सणाला आदिवासी पाड्यात जाऊन मदत करतात. मंडळाच्या वतीने डोंबिवलीत आरोग्य शिबीर आयोजित केले जाते.गणेशोत्सव साजरा करताना मंडळाने आजवर अनेक सामाजिक कार्य केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email