नवजीवन सुपरशॉपतर्फे ‘फेस ऑफ द वूमन्स डे’ स्पर्धा
जळगाव – सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबविणारे ‘गृहिणींच्या निवडीचे – कुटुंबाच्या आवडीचे’ असलेले नवजीवन सुपरशॉपने जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या महिला ग्राहकांसाठी ‘फेस ऑफ द वुमन्स डे’ ही स्पर्धा आयोजित केली आहे..
दि. 8 ते 10 मार्च असे तीन दिवस या स्पर्धेचा कालावधी असून, जागतिक महिला दिनानिमित्त महिला ग्राहकांकरिता ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत छायाचित्रकार सुमित देशमुख ऑन द स्पॉट फ्री छायाचित्र काढून, त्याची तात्काळ प्रतही देण्यात येणार आहे. तीन दिवसादरम्यान काढण्यात आलेल्या छायाचित्रांमधून तीन छायाचित्रांची परीक्षकांतर्फे निवड करण्यात येणार येऊन त्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.10,000, द्वितीय रु.5000, तृतीय रु. 2000 आणि उत्तेजनार्थ 10 बक्षीसे रु.500 चे खरेदी कूपन देण्यात येणार आहे. प्रथम तीन पारितोषिकप्राप्त छायाचित्रे प्रकाशित करण्यात येणार आहेत. स्पर्धेकरिता दि. 8 मार्च रोजी बहिणाबाई शाखा, दि. 9 मार्च रोजी महाबळ शाखा तर दि. 10 मार्च रोजी मानराज पार्क शाखा येथे छायाचित्रे काढण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवजीवन सुपरशॉपचे संचालक अनिल कांकरिया यांनी केले आहे.