नवजात अर्भकाच्या हत्येचा गुन्हा चार जणांना अटक

नवजात अर्भकाच्या हत्येचा गुन्हा चार जणांना अटक

श्रीराम कांदू

कल्याण : अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकून देण्याच्या गुन्ह्याची अखेर कल्याणच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उकल केली आहे. तसेच या हत्येप्रकरणी जन्मदाती आई, आजीसह चार जणांना अटक केली आहे.

९ ऑक्टोबर रोजी पिसवली पाईपलाईन रोडवर प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत एका नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला होता. त्या अर्भकाची मान चिरून त्याची हत्या केल्याचे मानपाडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाल्याने पोलिसांनी हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा कल्याण गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला होता. पिसवली येथील साईसिद्धी सोसायटीतील रहिवासी आणि सुरक्षा रक्षक यांच्याकडे याप्रकरणी विचारपूस केली असता रूम नंबर ४ मध्ये राहणारी मुलगी मंदिरा सपन बेनर्जी (२०) हि अनैतिक संबंधातून गरोदर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेवून तिची विचारपूस केली असता तिने सगळा प्रकार सांगितला .त्यानुसार तिचे कमलेश रमेश भानुशाली ( २९ ) रा. नांदिवली आणि महेश विष्णू बांडे (२४ ) रा. कळवा यांच्याशी प्रेमसंबंध तसेच शारीरिक संबंध होते. त्या संबंधातून ती गर्भवती राहिली होती. तिने हि बाब त्या दोघा प्रियकरांना सांगितली  असता त्यांनी गर्भपात करण्यासाठी गोळ्या देवून दुर्लक्ष केले. अखेर  ९ ऑक्टोबर रोजी तिला कळा सुरु झाल्या. तेव्हा तिची आई शांता सपन बेनर्जी (४५) हिने तिचे घरीच बाळंतपण केले. त्यावेळी जन्माला आलेल्या पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा घरातील सुरीने गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बालकाचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत गुंडाळून इमारतीच्या मागे फेकून दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी मंदिरा बेनर्जी, शांता बेनर्जी, कमलेश भानुशाली आणि महेश बांडे या चौघांना अटक केली आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email