नर्तिका नाचवण्यास विरोध केल्याने पोलिसांवरच दगडफेक,३२ जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांवरच दगडफेक ३२ जणांवर गुन्हा दाखल, सात जणांना अटक

(म.विजय)

शिरूर – राक्षसभुवन येथे देवीच्या यात्रेत छबीणा मिरवणूकीत नर्तिका नाचू नये म्हणून गावातील काही लोकांनी विरोध केला. मात्र या विरोधाला डावलून काही अतिउत्साही मंडळींनी नर्तिका आणून नाचवण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिरूर पोलीसाकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी नर्तिकांना नाचवण्यास प्रतिबंध लावला या कारणावरून काही लोकांनी पोलीसावरच दगडफेक करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यात पीआयसह दोन कर्मचारी जखमी झाले. काही नागरिकही जखमी झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शिरूर पोलीसात ३२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून सात आरोपींना अटक करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन येथे जगंबा देवीची यात्रा होती. यात्रे निमित्ताने छबीणा मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकीत गावातील काही नागरिकांनी नर्तिका नाचवण्याचा निर्णय घेतला आणि नर्तिकाही आणल्या होत्या पण गावामधील प्रतिष्ठीत नागरिकांनी नर्तिका नाचवण्यात विरोध केला. छबीण्यात नर्तिका नाचवू नये याबाबतचे निवेदन शिरूर पोलीस ठाण्याला दिले होते. रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्यान छबीणा निघाला आणि नर्तिका नाचवण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीसांनी नर्तिका नाचवण्यास प्रतिबंध करत नर्तिकांना आपल्या गावी पाठवून दिले. यावेळी ज्यानी नर्तिका आणल्या होत्या त्यांनी पोलीसांवर दगडफेक करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या दगडफेकीमुळे छबीणा मिरवणूकीत एकच धावपळ उडाली होती. दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले. यात पीआय काझी, पो.कॉ.समाधन शेळके, पो.ना.नागरगोजे यांना मुक्कामार लागला. या प्रकरणी ३२ आरोपी विरोधात कलम १४७, १४९, ३५३, ३५२, ५०६ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या ३२ आरोपी पैकी ईश्वर राम खोले, हरिभाऊ सखाराम कोठुळे, साजेद अमीन पठाण, शमशोद्दीन रसुल पठाण, अमोल खोले, सखाराम तुकाराम खोसे आणि सिराज पठाण या सात आरोपींना पोलीसांनी अटक केली. तर जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूरचे पोलीस करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email