नरेंद्र दराडेवर उमेदवारी रद्दतेची टांगती तलवार हटली

नाशिक – नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. निवडणुकीतील शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंच्या डोक्यावरची उमेदवारी रद्दतेची टांगती तलवार अखेर हटली आहे. सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अर्जवर राष्ट्रवादीनी हरकत घेतली १२ तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला आहे.

शपथपत्रात एक महत्वपूर्ण रकाना गहाळ केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णय प्रलंबित आहे.  तसेच दराडे यांनी येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी न भरल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला होता. दराडे यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसाची माहिती असणारा रकाना जोडला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला होता. मात्र याला प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा दराडेंकडून करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी चूक ग्राह्य धरण्यात येत नसल्यानं दराडे यांची उमेदवारी रद्द होण्याची चिन्हं होती.त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवला होता.अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दराडेंचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email