नगरसेवक रमाकांत पाटील यांनी केली भाजप प्रदेशाध्यक्षांकड़े अनधिकृत बांधाकामांची तक्रार
कल्याण डोंबिवली महानगरपालिच्या वार्ड क्रमांक १०९ गोलवाली मधे होणा-या अनधिकृत बाधाकामांविरुद्ध स्थानीय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रमाकांत पाटिल यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली व त्यांना आपल्या प्रभागात भूमाफिया तसेच मनपा अधिकारी यांच्या संगनमाताने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार केली.
भाजपा नगरसेवक रमाकांत पाटिल यांच्यासह कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार भाजपा कल्याण जिल्हा महासचिव शिवाजी आवाड भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती.यावेळी रमाकांत पाटिल यांनी आपल्या प्रभागात भूमाफिया तसेच मनपा अधिकारी यांच्या संगनमताने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार प्रदेश अध्यक्ष दानवे पाटिल यांच्याकडे केली.
नगरसेवक पाटिल यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रभागात होणा-या अनधिकृत बाधाकामांमुळे नागरिकांच्या समस्या वाढू लागल्या असून त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रमुख आहे.तसेच गटर,नाले यांच्या सफाईची समस्या आणि स्वछ्तेचा प्रश्न निर्माण होत आहे.परंतु या अनधिकृत बाधाकामांविरुद्ध करवाई होत नाही.भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी याप्रकरणी सविस्तर माहिती घेवुन संबंधित खात्याच्या मंत्री तसेच अधिक-यांकडून याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.