नगरसेवक रमाकांत पाटील यांनी अखेर शौचालायातील घाणीची छायाचित्रे आयुक्तांना व्हॉटसअपवर पाठवली

गोळवली येथील सार्वजनिक शौचालायाची स्वच्छते अभावी फारचं दुरावस्था

डोंबिवली – प्रभाग क्रमांक १०९ गोळवली येथील सार्वजनिक शौचालायाची स्वच्छते अभावी फारचं दुरावस्था झाली आहे. या प्रकरणी पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने गोळवलीचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी अखेर या शौचालायातील घाणीची छायाचित्रे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना व्हॉटसअपद्वारे पाठवली आहेत.

 

 

गोळवली येथील या सार्वजनिक शौचालायाची स्वच्छते अभावी फारचं दुरावस्था झाली असून पालिकेकडून फक्त रस्त्यावरील सफाई केली जाते. वारंंवार सांगुनही सदर शौचालायाची सफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने प्रभाग क्रमांक १०९ गोळवलीचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी अखेर या शौचालायातील घाणीची छायाचित्रे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना व्हॉटसअपद्वारे पाठवली आहेत.सदर छायाचित्रांची दखल घेवुन आयुक्तांंनी हा प्रश्न सोडवावा अशी विनंतीही त्यांनी केली.दरम्यान पालिका आयुक्त आता याप्रकरणी काय करवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.