नगरसेवक किशोर पाटकर यांची शाळांमध्ये मेटल डिटेक्टर बसविण्यासाठी केलेली मागणी रास्तच ….
नवी मुंबई – नवी मुंबईमनपातील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी नवी मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मेटल डिटेक्टर यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ,नवी मुंबई मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे. आणि मागणी किती रास्त आहे ही बाब अमेरिकेतील फ्लोरिडा येथील शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा सिद्ध झाली आहे ,कारण या घटनेने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या गोळीबाराच्या घटनेत १७ विद्यार्थी ठार झाले तर१४ जण जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या माजी विद्यार्थ्यानेच हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ही घटना पार्कलँडमधील मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये घडली आहे. सामान्य नागरिक असलेला १९ वर्षांचा शाळेचा एक माजी विद्यार्थी जर असे कृत्य करू शकत असेल तर मागील काही घटनांचा आढावा घेतल्यास असे लक्षात येईल की, दहशतवादी -अतिरेकी कारवाया करणारे घटक सहजपणे शाळांना लक्ष्य करून आपल्या क्रूर विचारांना सत्यात उतरवू शकतात.