नगरसेवकाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी देणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल
- नगरसेवकाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी देणाऱ्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल
ठाणे – कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्र. १०८ चे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी डोंबिवलीतील भाजपच्याच बाहुबली नगरसेवक महेश पाटील यांनी दिली होती. पाटील यांच्यासह ११ जणांवर हत्येसाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महेश पाटील
नगरसेवक कुणाल पाटील हे दावडीचे रहिवासी असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्र. १०८ मधून भाजप पुरस्कृत नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. दीड वर्षाने होणाऱ्या विधानसभेसाठी कल्याण ग्रामीणमधून आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र त्यांची हत्या करण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये अॅडव्हान्सही घेतल्याची कबुली एका आरोपीने दिली होती. पोलिसांनी समांतर तापस सुरु करून आज गणेशपुरी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम १२० ब, ३०२ सह ११५ व आर्म्स ऍक्ट ३२५ अंतर्गत नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे यांच्यासह इतर ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कबुली देणाऱ्या सराईत आरोपीसह एकूण ६ जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून १ पिस्तूल, १ रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे व ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. या बाबत महेश पाटील

यांच्या शी संपर्क होऊ शकला नाही
Please follow and like us: