नगरसेवकांच्या कार्यपद्धती वर राज ठाकरे नाराज

मनसैनिकांनो, सोशल मिडीयाचा अधिक वापर करा, डोंबिवलीच्या मेळाव्यात कार्यकत्यांना दिला सल्ला नगरसेवकांच्या कार्यपद्धती वर नाराज

 

(श्रीराम कांदू)
डोंबिवली : सध्या सोशल मिडीयाचे युग आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा अधिक वापर करा, जनतेची कामे करा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी डोंबिवलीत पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांना दिला.त्या अगोदर झालेल्या बैठकीत राज यांनी आपल्या नगरसेवकांच्या कार्य पद्धती वर नाराजी दर्शवली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या दौ-यावर आले आहेत. त्यानिमिताने सकाळी पदाधिकारी व कार्यकत्यांचा मेळावा पार पडला. जनतेची कामे करा. लोकांपर्यंत पोहचा असे आदेश राज यांनी देत  कामे  कशाप्रकारे करावीत याच्या सुचना दिल्या. सध्या सोशल मिडीयाचे युग आहे.  प्रत्येकाने सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात करा असा राजमंत्रही कार्यकत्यांना दिला. राज यांनी मनसेच्या नगरसेवकांशी चर्चा केली, त्यावेळी नगरसेवकांनी कामे होत नसल्याचे गा-हाणे त्यांच्यासमोर मांडले. पण राजठाकरे यांनी पाहिले तुमचे काम करण्याची पद्धत सुधारा  असे सांगून त्याच पार्श्वभूमीवर राज हे शनिवारी केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email