नगरसेवकांचा अभ्यास दौरा रद्द करा, अन्यथा भीक मागून पैस गोळा करू : 

 नगरसेवकांचा अभ्यास दौरा रद्द करा, अन्यथा भीक मागून पैस गोळा करू : 

 डोंबिवली मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा

डोंबिवली : एकिकडे केडीएमसीची आर्थिक स्थिती कमकुवत असतानाच दुसरीकडे नगरसेवक व अधिका-यांनी ४० लाख रूपये खर्चून कलकत्ता व गंगाटोक अभ्यास दौ-यांचा घाट घातल्याने सर्वच स्थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. डोंबिवली मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने दौ- याला तीव्र विरोध दर्शविण्यात आलाय. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून, महापालिकेला आणखी कर्जात बुडवून नगरसेवक दौऱ्यावर जाणार असतील तर नागरिकांच्यावतीने मनविसे रस्त्यावर भीक मागून दौऱ्यासाठी पैसे गोळा करून निषेधात्मक मदत करतील असा इशारा मनविसेचे डेांबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी दिलाय.

येत्या १७ डिसेंबरला कोलकत्ता व गंगटोक येथे अभ्यास दौरांचे आयोजन करण्यात आलय. महापौरांनी नगरसेवकांचा दौरा त्वरीत रद्द करावा अशी मागणी जेधे यांनी केलीय. केडीएमसी आयुक्तांनी २६५ कोटींची तूट जाहिर करून, येत्या दोन वर्षात एकही नवीन विकास कामं हाती घेता येणार नाही असे सांगितल. महापालिकेच्या शाळेत शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही विद्याथ्र्यांना गणवेशाचे पैसे मिळाले नाही. महापालिकेतील तरूण उदयोन्मुख खेळाडूंना कुठल्याही सोयी सुविधा पूरविल्या जात नाही अथवा कोणतीही मदत केली जात नाही. प्रणव धनावडे सारख्या विश्वविक्रमी खेळाडूला क्रिडांगणाच्या असुविधेला सामोरे जावे लागते. सुसज्ज क्रिडांगण महापालिका उपलब्ध करून देत नाही. आनंद बालभवनमध्ये बालक व विद्यार्थांसाठी कार्यक्रम होत नाही की त्याचे धोरण नाही. महापालिका हद्दीतील शाळा कॉलेज सभोवतालचे रस्ते खड्यात सापडलेत. रस्ते दुरूस्तीला पालिकेकडे पैसे नाही अशी आर्थिक चणचण असताना अभ्यास दौ- यांचा अट्टाहास का ? असा सवाल जेथे यांनी उपस्थित केलाय. २० ते २२ वर्ष सत्ता राबविणाऱ्यांनी पालिका आर्थिक डबघाईलाच आणल्याचा आरोपही त्यांनी केला.  यापूर्वी अनेकवेळा अभ्यास दौरे काढले त्यावर कोटयावधी रूपये खर्च केले. दौ-यांच्या नावाखाली पिकनिक काढली जाते. या दौ-यांचा  पालिकेला काय फायदा झाला याची माहिती कधीही जाहीर केलेली नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून पिकनिक काढली जात असल्याचे  जेधे म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email