नकली सोन्याच्या बदल्यात सोन्याचे खरे दागिने घेवुन त्रिकुटाचे पलायन
उल्हासनगर –नकली सोन्याच्या बदल्यात सोन्याचे खरे दागिने घेवुन एका त्रिकुटाने सोनाराची फसवणुक केल्याची घटना येथील हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
१७ जानेवारी रोजी जेटाराम प्रजापती यांच्या अंबरनाथ येथील सोन्याच्या दुकानात तीन जण आले यात एका महिलेचाही समावेश होता.घराच्या खोद्कामात सोने सापडल्याची बतावणी कुरुन त्यानी ४ हार ,८ चेन ,मंगळसूत्र,अंगठ्या असे २७७ ग्राम वजनाचे ६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे दागिने बवायाला दिले.या नंतर रविवारी दुपारी येवून त्यांना आपल्याकडील सोने देवून तयार दागिने घेवुन तेथून पोबारा केला.त्यानी दिलेले सोने नकली असल्याचं प्रजापती याना समजताच त्यांनी हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
Please follow and like us: