धूम स्टाईलने महिलेची पर्स लंपास

डोंबिवली – कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरात शुक्ला अपार्टमेंट मध्ये राहणारी मालती मुदलियार हि महिला काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नितीन राज हॉटेल समोरून पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने क्षणार्धात त्यांच्या हातातील रोख रक्कम व कागद पत्र अशी १२ हजार ५०० मुद्देमाला असलेली पर्स हिसकवून तेथून धूम ठोकली .या प्रकरणी सदर महिलेने कोल्शेवादी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.