धूम स्टाईल ने महिलेचा हजारोंचा ऐवज लंपास
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीत धूम स्टाईलने एका महिलेची रोख रक्कम व दागिने असा सुमारे ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लांबवण्यात आल्याची घटना घडली आहे .
डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात देशमुख होम्स मध्ये राहणारी महिला काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला रिक्षाने जात असताना पेंढारकर कोलेज शेजारील चौकात रिक्षा पोचताच पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर दोन अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील रोख रक्कम व दागिने असा मिळून ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स हिसकवून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: