धूम स्टाईलने रोकड लंपास
( श्रीराम कांदु )
कल्यान : धूम स्टाईल चोरट्यांची दहशत कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात वाढत असून वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात शिवमल्हार आर्केडमध्ये राहणारी महिला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या पत्री पूल परिसरातून चालत जात होती. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने तिच्या खांद्यावर अडकविलेली रोकड असलेली पर्स हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सदर महिलेने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: