धूम स्टाईलने मोबाईल लंपास व् अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त.

(श्रीराम कांदु)

डोंबिवली  : डोंबिवली पुर्वेकडील ठाकुर्ली नव्वद फिट रोड वसंत पार्क येथे राहनरे श्रीकांत कुरूप बुधवारी  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली येथील 90 फूट रोड वरून पायी चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीवर तीन जण आले त्यांनी क्षणार्धात श्रीकांत यांच्याजवळील मोबाईल हिसकवत धूम ठोकली या प्रकरणी श्रीकांत यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी गुन्हा नोंद करत पुढील तपास सूरु केला आहे .
—————————————————————————————————————
 शाळेच्या वॉचमनला लुटले
डोंबिवली : कल्याण  पश्चिम नजीक असलेल्या मोहने येथिल गाळेगाव पाटील चाळीत राहनरे जयबहाद्दूर थापा हे कल्याण पश्चिमेकडील लुड्स कायस्कुल मध्ये काम करतात .काल सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास ते शाळेचे खाते असलेल्या मुरबाड रोड वरील एक बँकेतून १०  हजार रुपये काढत होते त्यावेळी एक अज्ञात इसमाने त्यांना हटकले व पेन मागितला .थापा पैसे काढून पुन्हा शाळेच्या दिशेने परतत असताना रामबाग लुड्स चर्च जवळ पोहचले असताना  पेन मागणाऱ्या इसमा ने आपल्या एका साथीदारासह त्यांना गाठले .त्यांनीं थापा याना पकडून त्यांच्या कडील १०  हजार रुपये रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला या प्रकरणी थापा यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
————————————————————————————————–
दोन कार्यकाये  फोडली
डोंबिवली  :डोंबिवली पुर्वेकडील टंडन रोड वर्षा निवास पहिल्या माळ्यावरील सेंटरम मायक्रो क्रेडिट व शेजारी आलेल्या क्रिसिल कन्सल्टंट या दोन कार्यालयाचे कुलूप काल पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी तोडून दोन्ही कार्यलयातील मिळून एकूण ८४  हजार २९०  रुपयांची रोकड व लॅपटॉप व मोबाईल असा मिळून एकूण ११  हजार ८००   रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .सकाली कार्यलयात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यलयात चोरी झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे
———————————————————————————————————–
सरकारी विभागाचे महत्वाचे पद देण्याचे आमिष दाखवुन ठेकेदाराला ४  लाखांचा गंडा
डोंबिवली  : सरकारी विभागाचे महत्वाचे पद देतो असे आमिष दाखवत एक ठेकेदाराला दुकलीने तब्बल चार लाखाना गंडवले आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल करन्यात आला आहे .
          मुंबई वरळी येथे राहणारे शमशुद्दीन शेख 33 हे म्हाडाचे काँट्रॅकटर आहेत .शेख यांची रवी वैद्य आणि जावेद तडवी यांच्याशी ओळख झाली होती .एप्रिल मध्ये या दोघांनी शेख यांना आमची सरकारच्या दिल्ली येथील इमारत आणि बांधकाम विभागात ओळख आहे तुम्हाला तेथील महत्वाचे पद मिळवून देतो असे खोटे आमिष दाखवत शेख यांच्याकडून तब्बल चार लाख रुपये उकळले .मात्र बराच कालावधी उलटूनही ही पदाबाबत काही हालचाल दिसून येत नसल्याने शेख यांनी आपले पैसे परत मागितले .शेख यांनी पैशांसाठी तगादा लावला असता या दोघांनी त्यांना शिविगाळ कर पैसे देन्यास नकार देत धमकी दिली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसार पोलिस्नी रवी वैद्य व जावेद तडवी विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे .
—————————————————————————————————-
भुरळ घालत भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या पळवल्या
डोंबिवली  : कल्याण डोंबिवलीत भुरळ घालत हातचलाखीने महिला विशेषतः वृद्ध महिलानाचे दागिने पळवण्याच्या घटना वाढल्या असुन महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.अशीच एक घटना कल्याण पश्चिमेकडील गजानन विद्यालयानजीक घडली .भिवंडी कोणगाव येथे राहणारी ७५  वर्षीय महिला भाजी विक्री करत आपला उदरनिर्वाह करते .सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सदर महिला कल्याण पश्चिमेकडील गजनन विद्यालयाच्या शेजारील गल्लीतून जात असताना एका अद्न्यात इसमाने तिला हटकले तिला।बोलण्यात गुंतवून तिच्या हातात बिस्किटाचे पुडे दिले त्यानंतर १००  रुपयांच्या दोन नोटा देत त्यांना भुरळ घालत हातचलाखीने या वृद्ध महिलेच्या हातातील सुमारे ६०  हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेत तेथून पळ काढला  या प्रकरणी सदर महिलेने काल सायंकळी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली  असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.