धुमस्टाईल लूटपाट करणारयांचे लक्ष्य कल्याण पूर्वीकड़े,53 वर्षीय महिलाचे चेन लुटली,व् अन्य अपराध वृत्त

(श्रीराम कांदु )

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील संतोष नगर मधील आकाशगंगा इमारतीत राहणारी 53 वर्षीय महिला आपल्या मुली सोबत सोमवारी रात्री नगरसेवक महेश गायकवाड यांच्या ऑफिसकडून रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीची चेन खेचून धूम ठोकली .याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोटारसायकल चोरी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील दत्त नगरमधील चंद्राबाई निवास मध्ये राहणाऱ्या दीपक वसंत मोरे (23) याने नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री आपली बजाज पल्सर मोटारसायकल घराजवळ पार्क केली असता चोरीला गेली .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

डोंबिवलीत घरफोडी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव येथील गजानन कृपा चाळीत राहणारे दिलीप अनंत पाटणकर (42) यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील टीव्ही चोरून नेला .याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email