धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रातही करावा, उल्हासनगर येथे हिंदुत्वनिष्ठांची जनआंदोलनाद्वारे मागणी

उल्हासनगर – पाकिस्तान आम्ही जमीनदार होतो. फाळणीनंतर केवळ धर्म रक्षणासाठी आम्ही आमचे सर्वस्व सोडून भारतात आलो. पण आज तोच हिंदू धर्म सोडून काही सिंधी ख्रिस्ती होत आहेत ही खेदाची बाबा आहे. व्यापारी शहर म्हणून सुप्रसिद्ध असलेले उल्हासनगर आज धर्मांतरणसाठी कुप्रसिद्ध होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धर्मांतर हे आतंकवादा पेक्षा मोठे संकट असून याला संघटितपणे विरोध करा असे परखड मत उल्हासनगरचे नगरसेवक मनोज लासी यांनी उल्हासनगर परिसरात धर्मांतराच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या आंदोलनात व्यक्त केले.

 

धर्मांतर बंदी कायदा करावा अशी मागणी आंदोलनात केली. येथील कॅम्प १ मधील गोल मैदानावरील भगवंती नावानी स्टेज उल्हासनगर येथे संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठां प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याच्या ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत, तर कोट्याधीश ते गरीब कुटुंबातील असाहाय्य आणि त्रस्तपणाचा गैरफायदा घेऊन ख्रिश्‍चन मिशनऱ्यांनी आतापर्यंत येथील १ लाखाहून अधिक सिंधी आणि अन्य समाजातील हिंदूंचे धर्मांतर केले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या धर्मांतराच्या भस्मासूराविरुद्ध एकत्र येऊन ख्रिश्‍चन मिशनर्‍यांना रोखण्याचा एकमुखी निर्धार करत जवळ २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक धरले होते, तर धर्मांतराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर ४९० लोकांनी स्वाक्षरी करून आपले धर्मकर्तव्य बजावले. या आंदोलनात १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

आंदोलनात सहभागी संघटना
सिंधी कॉन्सिल ऑफ इंडिया, जय झुलेलाल सेवा संघर्ष समिती, प्रबळ संघटना, हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, सिंधू सत्याग्रह, सिंधी संस्था, विश्व सिंधी समाज संघ, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, ब्राह्मण एकता महासभा, ब्राह्मण सभा संघ, उल्हासनगर व्यापारी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, योग वेदांत समिती, पतंजली परीवार, वंदे मातरम प्रतिष्ठान, भारतीय जनहित सेवा समिती, श्रीराम हिंदु सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, धर्म जागरण मंच, युवाशक्ती संघटना,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदी संघटनांसह, सोशल मिडियाचे कार्यकर्ते व भाजप या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करायची आज वेळ आली आहे. – प्रकाश तलरेजा, जय झुलेलाल संघर्ष समिती

उल्हासनगर शहरात अनुमाने ४ लक्ष सिंधी समाजाचे लोक आहेत. त्यातील अनुमाने १ लक्ष लोक ख्रिस्ती पंथात धर्मांतरीत झाले आहेत, ही गोष्ट पुष्कळ गंभीर आहे. धर्मांतराच्या विरोधात आज रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली आहे. केवळ समाजमाध्यमांतून चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही. सिंधी समाजातील लोकांनी पुन्हा आपल्या हिंदू धर्मात यावे, त्यांच्यासाठी सर्व मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

देशातील ७ राज्यांत लागू करण्यात आलेला धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्र राज्यातही लागू करावा – डॉ. उदय धुरी, मुंबई प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्माभिमान नसलेल्यांना धर्मांतरित करणे ख्रिस्ती धर्मप्रसारकांना सोपे जाते. यावर उपाय म्हणून सर्व सिंधी समाजाने या विरोधात एकत्र येऊन देशातील ७ राज्यांत लागू करण्यात आलेला धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्र राज्यातही लागू करावा म्हणून शासनावर दबावगट निर्माण केला पाहिजे.

एक हिंदू धर्मांतरीत होतो तेव्हा एक हिंदू कमी होतो एवढेच नसून एक शत्रू वाढतो हे लक्षात ठेवा – सौ. नयना भगत, मुंबई प्रवक्ता, सनातन संस्था
ज्या स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृतीची महती सातासमुद्रापलीकडे नेली त्यांनीच सांगितले आहे, जेव्हा एक हिंदू धर्मांतरीत होतो तेव्हा एक हिंदू कमी होतो एवढेच नसून एक शत्रू वाढतो याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवे. ज्या मुघल आक्रमकांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मातरण केले, महिलांवर अत्याचार केले आज तेच धर्मांध हिंदु मुली आणि महिलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून जिहाद करत आहेत, तर दुसरीकडे ठिकठिकाणी चर्च उभारून अत्यंत छुप्या पद्धतीने हिंदूंचे धर्मांतरण सुरू आहे या धोक्याचे गांभीर्य ओळखा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ८ सहस्त्र ३०० जणांनी हे आंदोलन अनुभवले, तर १३६ जणांनी या आंदोलनाचे चित्रीकरण शेअर केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email