धमेंद्र प्रधान यांनी 50 भौगोलिक क्षेत्रातल्या 12 यशस्वी घटकांना वितरीत केली शहर गॅस वितरण इरादापत्र
नवी दिल्ली, दि.०१ – केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातल्या 50 भौगोलिक क्षेत्रातल्या 12 यशस्वी घटकांना शहर गॅस वितरण इरादापत्र वितरीत केली. शहर गॅस वितरणासाठी नुकत्याच झालेल्या बोली प्रक्रिये अंतर्गत ही इरादापत्र वितरीत करण्यात आली.
हेही वाचा :-
यामुळे देशातल्या 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या देशातल्या 70 टक्क्यांहून अधिक जनतेला सुलभ, पर्यावरण-स्नेही आणि खत, नैसर्गिक वायू उपलब्ध होईल. या इरादापत्र अंतर्गत 2 कोटी जोडण्या देण्यात येतील, तसेच 3 हजार 578 सीएनजी-स्टेशन कार्यरत करण्यात येतील. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड आदी राज्यांचा समावेश आहे.
Please follow and like us: