धक्कादायक सतत चॅटिंगच्या सवयीवर बायको रागावली म्हणून नवऱ्याची आत्महत्या

सतत चॅटिंगच्या सवयीवर बायको रागावली म्हणून नवऱ्यानी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना तेलंगणामधील सिकंदराबाद येथे घडली. विशेष म्हणजे या दांपत्याचं काही काळापूर्वीच लग्न झालं होतं. शिव कुमार (२७) असं या तरुणाचं नाव आहे. त्याचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पण त्याला व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायची सवय होती. लग्नानंतर तो त्याची लहानपणीची मैत्रीण असलेल्या वेनेला नावाच्या तरुणीशी गप्पा मारायचा. मात्र, त्यामुळे त्याची बायको त्याला अस न करण्याबाबत समजवत होती. पण त्याची चॅटिंगची सवय सुटली नाही. त्यामुळे बायकोने त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. त्याचाही काही परिणाम होत नाही, ते पाहून ती त्याच्याशी भांडतही असे.

ही घटना घडली त्याच्या आदल्यादिवशीही त्या दोघांमध्ये चॅटिंगवरून भांडण झालं होतं. रागाच्या भरात शिवच्या बायकोने शेजारपाजाऱ्यांनाही त्याच्या या सवयीबद्दल सांगितलं. त्यामुळे व्यथित झालेल्या शिवने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर शिवची मैत्रीण वेनेला हिनेही अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email