धक्कादायक ; पोटच्या मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन अत्याचार

भिवंडी – भिवंडीत एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच मुलीला गुंगी व गर्भधारणा टाळण्यासाठी गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर वांरवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील श्रीरंगनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पित्याविरोधात बलात्कारासह पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या पित्याला गजाआड केले आहे. दरम्यान, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार पीडित मुलगी आई, वडील व दोन बहिणींसोबत श्रीरंगनगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहते. सदर पीडित मुलीचे कुटुंब गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जुन्या घरी राहत होते. त्यावेळी ती आई व दोन बहिणींसोबत रात्रीच्या सुमाराला घरात झोपलेली असताना नराधम पित्याने त्या मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आई व दोन्ही बहिणींना ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे मुलगी भयभीत झाली होती.

याचाच गैरफायदा घेऊन वासनांध झालेल्या या नराधमाने तिला गुंगी यावी व गर्भधारणा होऊ नये यासाठी काळ्या व सफेद रंगाच्या गोळ्या देवून तिच्यावर वारंवार राहत्या घरातच बलात्कार केला. दरम्यान मुलीला वारंवार होणार्‍या अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने तिला 7 नोव्हेंबर रोजी गुंगी व गर्भ धारणा टाळणार्‍या गोळ्या खाण्यास दिल्या असता तिने त्यास मनाई केली. त्यामुळे या पित्याने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली व पुन्हा आई व दोन्ही बहिणींना ठार मारण्याची धमकी देवून अत्याचार केला. त्यामुळे सततच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने धाडस करून शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नराधम पित्याविरुद्ध पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email