धक्कादायक : नागपूरमध्ये ट्रकने तीन विद्यार्थ्यांना चिरडले
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यालयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. घटनेनंतर वाहनचालकाने पोबारा केला आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केल्याने परिसरात तणाव होता. आंदोलनामुळे भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले.
Please follow and like us: